Follow by Email

माहितीचा अधिकार हा पुढचा टप्पा -

रुळ बदलताना गाडी जसा खडखडाट करते, तसाच खडखडाट माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही व्यवस्थेत बदल होताना जाणवू लागला आहे. लोक हा अधिकार दणदणीतपणे वापरू लागलेत. वास्तविक हा अधिकार जनहितार्थ वापरला पाहिजे, परंतु व्यकिगत अन्याय झाला की हक्कांची गरज पडू लागते, याच भूमिकेतून हा अधिकार वापरला जाऊ लागला. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा अधिकार लोकांच्या हाती आला. लोकशाहीत मतदानाशिवाय लोकसहभाग नव्हता, तो माहितीच्या अधिकाराच्या निमित्ताने मिळाला. मानवी हक्क संरक्षणासाठी हा अनोखा मार्ग आहे. आपल्याविरुद्ध झालेल्या अन्यायाविरोधात आपणच पुरावे गोळा करुन संरक्षण तयार करण्याची संधी या अधिकाराने दिली. न्यायाधीशांनी १९८०च्या दशकात कृष्णा अय्यर आणि भगवती यांनी न्यायदानातूनच चळवळ चालवली. अशा प्रवृत्तीचे न्यायमूतीर् ही सकारात्मक बाब आहे. सामाजिक प्रश्नांविषयीची जागरुकता दाखवणाऱ्या या चळवळींनी न्यायालयांची सर्जनशीलता टिकवली. माहितीच्या अधिकार हा त्या सकारात्मकतेचा आजचा आविष्कार आहे. प्रश्नच विचारायचे माहिती नसलेल्या समाजात नेमकेपणाने प्रश्ान् विचारण्याचे बळ माहितीच्या अधिकाराने दिले, हा खूप मोठा बदल झाला आहे.

No comments: