Follow by Email

Tenancy Land Transfer Revised Procedure

मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम, 1948 च्या कलम-43 मध्ये, हैद्राबाद कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, 1950 च्या कलम-50(ब) मध्ये व मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ विभाग) अधिनियम, 1958 च्या कलम-57 मध्ये कुळ हक्काने मिळालेल्या जमीनी विक्री करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेण्याची असलेली तरतूद, सन 2014 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक- 1 अन्वये सुधारीत करण्यात आली आहे. सदर अधिनियम महाराष्ट्र शासन राजपत्र (असाधारण) भाग-चार व भाग-आठ, मध्ये दिनांक 07.02.2014 अन्वये प्रसिध्द करण्यात आला आहे.

मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम, 1948 च्या कलम-43, हैद्राबाद कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, 1950 च्या कलम-50(ब) व मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ विभाग) अधिनियम, 1958 च्या कलम-57 नुसार कुळहक्कोन मिळालेली जमीन खरेदी-विक्री/ देणगी/ अदलाबदल/ गहाण ठेवणे/ ती पटटयाने देणे/ अभिहस्तांतरण करणे याकरिता जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीची तरतुद काही अटींवर शिथील करण्यात आली आहे. त्याबाबतची नवीन तरतुद पुढीलप्रमाणे आहे:-

मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 च्या कलम-43, हैद्राबाद कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, 1950 च्या कलम-50(ब) व मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ विभाग) अधिनियम, 1958 च्या कलम-57 या कलमांच्या पोटकलम-(1) मध्ये, विदयमान परंतुकानंतर पुढील परंतुक जादा दाखल करण्यात आले आहे.

परंतु आणखी असे की, या पोट कलमात नमुद केलेल्या कलमांन्वये ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकांपासून 10 वर्षाचा काळ लोटला असेल, अशा जमिनींच्या बाबतीत, तिची विक्री करण्याकरीता, ती देणगी देण्याकरीता, तिची अदलाबदल करण्याकरीता, ती गहाण ठेवण्याकरीता, ती पटटयाने देण्याकरीता, किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरीता पुढील शर्तीस अधिन राहून, अशा कोणत्याही पुर्वमंजूरीची आवश्यकता असणार नाही –

(क) शेतजमीनीची विक्री करण्यापूर्वी, विक्रेता जमीन महसूल आकारणीच्या 40 पट इतकी नजराणा रक्कम शासनाला देईल,
(ख) खरेदीदार हा शेतकरी असला पाहिजे,
(ग) खरेदीदार हा महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 अन्वये अनुज्ञेय असलेल्या कमा क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही, आणि
(घ) मुंबईचा जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबतचा अधिनियम 1947 यांच्या तरतूदीचे उल्लघंन केले जाणार नाही.

03. उक्त सुधारणेच्या अनुषंगाने संबंधित कुळ कायदयानुसार प्राप्त ज्या जमिनीस, कुळहक्क मान्य होऊन कुळांनी खरेदी केलेल्या आहेत, अशा खरेदीच्या दिनांकापासून 10 वर्षे पूर्ण झालेल्या जमीनींची खरेदी-विक्री/ देणगी/ अदलाबदल/ गहाण ठेवणे/ ती पटटयाने देणे/ अभिहस्तांतरण करणे या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर नियंत्रित सत्ता प्रकार म्हणून असलेल्या नोंदी सुधारित करणे तसेच या सुधारणेच्या अनुषंगिेक बाबींच्या प्रभावी अंमलबजावणीच्या उददेशाने, सदर सुधारणा सामान्य नागरिकापर्यंत पोहचविण्याकरीता, व क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांना नजराणा रक्कम भरुन घेण्याबाबत नेमकी कोणत्या स्तरावरील सक्षम प्राधिकाऱ्याने चलन मंजूर करणे आवश्यक आहे, याबाबत सर्व संबंधित क्षेत्रिय महसूल यंत्रणांना/ क्षेत्रिय महसूली अधिकाऱ्यांना शासनाच्या सुधारित सूचना खालीलप्रमाणे आहेत :


01. सन 2014 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक -1 हा महाराष्ट्र शासन राजपत्र (अससाधारण) भाग – चा व भाग – आठ दिनांक 07.02.2014 अन्वये मराठी व इंग्रजी भाषेत प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर अधिनियमातील सुधारित तरतुद शासन राजपत्रात प्रसिध्दीच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 07.02.2014 पासून अंमलात आली आहे.

02. मंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम, 1948 च्या कलम – 43 हैद्राबाद कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, 1950 च्या कलम – 50 (ब) व मुंबई कुळवहिवाट शेतजमीन (विदर्भ विभाग) अधिनियम, 1958 च्या कलम – 57 परंतुकान्वये जया जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकांपासून 10 वर्षाचा काळ लोटला असेल, अशा कुळ जमिनींच्या बाबतीत, तिची विक्री करण्याकरीता, ती देणगी देण्याकरीता, तिची अदलाबदल करण्याकरीता, ती गहाण ठेवण्याकरीता, ती पटटयाने देण्याकरीता, किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरीता दिनांक 07.02.2014 दिनांकापासून पुढे सुधारीत तरतुदीप्रमाणे कार्यवाही करणे अनिवार्य आहे.

03. मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम, 1948 च्या कलम – 43, हैद्राबाद कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, 1950 च्या कलम – 50 ब व मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ विभाग) अधिनियम, 1958 च्या कलम – 57 परंतुकान्वये उक्त प्रस्तावनेतील परिच्छेद 2 येथे नमुद सुधारित तरतुद करण्यात आली आहे.

04. सुधारित तरतुद पाहता, कुळ कायदयान्वये प्राप्त शेतजमीनीची विक्री करण्यापूर्वी, संबंधित विक्रेता शेतकरी विक्री करावयाच्या जमिनीच्या, जमीन महसूल आकारणीच्या 40 पट इतकी नजराणा रक्कम आदा करण्यास तयार/सहमत असेल आणि त्याकरीता तो तहसिलदार कार्यालयास अर्जाव्दारे कळविल. त्यावेळी तहसिलदार यांचेकडून जमा रकांचे विहीत लेखाशीर्ष नमुद असलेले व विक्री करावयाच्या जमिनीच्या आकाराच्या 40 पट इतक्या रकमेचे, चलन दोन दिवसांत तयार करुन संबंधित शेतकऱ्यास उपलब्‍ध करुन देण्ध्यात येईल. तसेच चलनात नमुद करक्कम संबंधित शेकरी यांनी शासकीय कोषागारात भरणा करणे आवश्यक राहील. सदर रकमेचा भरणा केलयानंतर चलनाची किंवा पावतीची प्रत संबंधित शेकरी तलाठयास सादर करील. त्यानुषंगाने तलाठी संबंधत शेतकऱ्याच्या 7/12 उताऱ्यावर नजराणा भरनणा केल्याची उचित नोंद नियमातील तरतुदीप्रमाणे घेईल. या नोंदीनंतर संबंधित शेतकरी उक्त परिच्छेद 2 मधील अनुक्रमांक ख, ग, व घ मधील तरतुदीच्या अधिन राहुन शेतजमीन विक्री करण्यास मुक्त राहील.

05. तसेच सुधारित तरतुद पाहता आणिखी नमुद करण्यात येते की, कुळ कायदयान्वये प्राप्त शेत जमीनीची विक्री न करता, अशा विक्रीपुर्वीच एक कायस्वरूनी सोय म्हणून किंवा भविष्यातील अडचणी व वेळ वाचविण्याच्या उद्देशाने, संबंधित शेतकरी त्याच्या शेतजमिनीच्या, जमीन महसूल आकारणीच्या 40 पट इतकी नजराणा रक्कम आदा करण्यास तयार /सहमत असेल आणि त्याकरीता तो तहसिलदार कार्यालयात अर्जाव्दारे कळविल. अशावेळी तहसिलदार यांच्याकडून जमा रकमांचे विहीत लेखाशीर्ष नमुद असलेले व विक्री करावयाच्या जमिनीच्या आकाराच्या 40 पट इतक्या रकमेचे, चलन दोन दिवसांत तयार करुन संबंधित शेतकऱ्यास उपलबध करुन देण्यात येईल. तसेच चलनात नमुद रक्कम संबंधित शेतकरी यांनी शासकीय कोषागारात भरणा करणे आवश्यक राहील. सदर रकमेचा भरणा केलयानंतर चलनाची/पावतीची प्रत संबंधित शेतकरी तलाठयास सादर करील. त्यानुषंगाने तलाठी संबधित शेकऱ्याच्या 7/12 उताऱ्यासवर नजराणा भरणा केलयाची उचित नोंद नियमातील तरतुदीप्रमाणे घेईल. या नोंदीनंतर संबंधित शेतकरी उक्त परिच्छेद – 2 मधील अनुक्रमांक ख, ग, व घ मधील तरतुदीच्या अधिन राहुन भविष्यात केव्हांही शेतजमीन विक्री करण्यास मुक्त राहल. 

06. सदर सुधारणेच्या प्रीाावी अंमलबजावणीच्या उद्देशाने सर्व संबंधित क्षेत्रिेय महसूली अधिकारी यांनी विहीत वेळेत व कालावधीत अशी कार्यवाही पूर्ण करावी. दिनांक 07.02.2014 पासून पुढे, सुधारित तरतुदींच्या लाभ मिळण्याकरीता जमिनीच्या खरेदी/विक्रीच्या दिनांकापासून म्हणजे कलम 32 –म अन्ष्वये प्राप्त प्रमाणपत्र रितसर नोदविलयाच्या दिनांकापासून संबंधित शेतकरी यांनी अशी जमीन प्रत्यक्ष विक्री करण्याप्रसंगीच्या दिवसापर्यन्त 10 वर्षाचा कालावधी पुर्ण असणे अनिवार्य आहे. तथापि, याबाबतीत विभागीय आयुक्त, नाशिक यांनी विचारणा केलेल्या अनुषंगाने आणिखी खालील बाबी स्पष्ट करण्यात येत आहेत. 

(अ) ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकापासून 10 वर्षाचा काळ लोटलेला नसेल, अशा जमिनीच्या बाबतीत, तिची विक्री करण्याकरीता, ती देणगी देण्याकरीता, तिची अदालाबदल करण्याकरीता, ती गहाण ठेवण्याकरीता, ती पटटयाने देण्याकरीता, किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरीता कुळ कायदयाच्या कलम 43 मधील पूर्वगामी मूळ तरतुदीप्रमाणे जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी संबंधित शेकऱ्याने घेणे आवश्यक राहील. 

(ब) ज्या ज्या शेकऱ्यांनी कुळ कायदयातील तरतुदीन्वये जिल्हाधिकारी यांच्याकडे विक्री करीता पुर्व परवानगीचे अर्ज दाखल केलेले आहेत, व अदयाप परवानगीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसून प्रकरणे विविध टप्यावर प्रलंबित आहेत. अशा प्रकरणी सुचित करण्यात येते की, कुळ कायदयातील सुधारणा दिनांक 07.02.2014 पासून अमंलात आलेली असल्याने, सुधारित तरतुदीत नमुद 10 वर्षाचा कालावधी ज्या ज्या प्रकरणी पूर्ण झालेला असूल, त्या त्या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी परवानगीची प्रक्रिया न अवलंबिता सुधारित तरतुदीप्रमाणे कार्यवाही तात्काळ करावी. याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांनी तात्काळ आढावा घेऊन सर्व प्रकारणे 100 टक्के निकाली निघाल्याची खात्री करावी.


(क) विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या शेतकऱ्यांनी धारण केलेल्या जमिनींच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकापासून 10 वर्षाचा काळ लोटलेला नसेल, अशा जमिनींच्या बाबतीत, तिची विक्री करण्याकरीता, ती देणगी देण्याकरीता, तिची आदलाबदल करण्याकरीता, ती गहाण ठेवण्याकरीता, ती पटटयाने देण्याकरीता, किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरीता कुळ कायदयाच्या कलम 43 मधील पूर्वगामी मूळ तरतुदीप्रमाणे व शासन परिपत्रक दिनांक 19.04.1979 नुसार कार्यवाही करण्यात यावी.

No comments: